त्रिंबकच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सुनीता त्रिंबककर यांचे निधन

⚡मालवण ता.२०-: त्रिंबक गावच्या रहिवासी आणि त्रिंबक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर (वय ६५) यांचे आज गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले.

मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या रहिवासी असणाऱ्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्रिंबक ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सदस्य म्हणून काम करताना सौ. त्रिंबककर यांनी गावच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवीत त्या प्रश्नांची सोडवणूक केली होती. परोपकारी वृत्तीमुळे त्या गावात लोकप्रिय होत्या त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. गेले काही वर्ष प्रदीर्घ आजाराने त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page