सिताराम गावडेंचा आरोप: लवकरच डी वाय एस पी कार्यालयावर धडक देऊन जाब विचारणार…
⚡सावंतवाडी ता.२१-: कोलगाव ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचे बांधव संदीप गवस व पत्नी यांच्यावर दाखल झालेल्या जातिवाचक गुन्हा हा राजकीय हेतूने करण्यात आला आहे. असा आरोप मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी आज येथे केला.
दरम्यान जर एखादा मराठा बांधवाला खोट्या गुन्ह्यात अडकून आपल्याकडे खेचण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर मराठा समाज हे कदापी खपून घेणार नाही. याबाबत लवकरच डीवायएसपी कार्यालयावर धडक देऊन आशा गुन्हा बाबत जाब विचारणार असल्याचं देखील गावडे यांनी यावेळी सांगितले ते येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
