Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात २१ व २२ रोजी टेबल टेनिस प्रशिक्षण…

मालवण (प्रतिनिधी) मालवण रेवतळे येथील विष्णू कोरगांवकर यांच्या मालवण टेबल टेनिस अकॅडमी मध्ये शनिवार दि.२१आक्टोबर रोजी सायंकाळी ३ ते ६ आणि रविवार दि.२२ आक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत टेबल टेनिस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात माजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीम.इंदू एन. आर. या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहेत….

Read More

कणकवलीच्या थाळीकरिता कष्टकऱ्यांची झुंबड

समीर नलावडे यांचा उपक्रम;अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभारंभ.. ⚡कणकवली ता.१८-: “थाळी कष्टकऱ्यांची” ‘पंगत आपलेपणाची’ या टॅगलाईनखाली कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कणकवली थाळीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावतीने मोफत थाळी देण्यात आली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी दुपारी याकरिता…

Read More

नांदगाव तिठा येथे अवैध दारु विक्री बंद करा अन्यथा १९ ऑक्टोंबरला धरणे आंदोलन…

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन… ⚡कणकवली ता.१८-: नांदगाव तिठा येथे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री उघडपणे केली जात आहे.कारवाईची मागणी करुनही ठोस कार्यवाही झाली नाही.त्यामुळेच पुन्हा नांदगाव येथे राजरोसपणे दारू विक्री करत आहेत.काही दिवसापूर्वी पोलिसांनी फक्त कारवाईचा देखावा उभा केला परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही ,असे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे…

Read More

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची 46 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर…

यावर्षीपासून खुल्या गटात घेतली जाणार प्राथमिक फेरी ⚡कणकवली ता.१८-: कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचेसुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेने सन 1978 पासून प्रवासाला सुरुवात केली, सर्वोत्तमतेचा ध्यास घेत वेगळेपणाची कास धरत गेली…

Read More

राजापुरी मार्गावरील दोन पुलांना नाबार्ड अंतर्गत मंजूरी…

निलेश राणें यांनी केली पाहणी; कित्येक वर्ष होत होती मागणी.. ⚡ओरोस ता.१८-: कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ओरोस प्रजिमा-३७ मार्गावरील अत्यंत महत्वाच्या दोन पुलांना नुकतीच नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकणी उंच पातळीच्या पुलांसाठीची मागणी होती पावसाळ्यात या ठिकाणी असलेल्या मोऱ्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबा होत होता त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे…

Read More

नांदगाव-असलदे येथील मुस्लिम समाज बांधवांचा भाजपात प्रवेश…

आ.नितेश राणे यांचा ठाकरे सेनेला सेनेला धक्का ⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील असलदे शिवाजीनगरमधील असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी ठाकरे सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत पदाधिकाऱ्यांसोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश भव्य स्वरूपात झाला.आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे भाजपची शाल घालून पक्षात…

Read More

डच वखारीच्या डागडुजीसाठी तीन कोटींचा निधी मंजूर…

डॉ.संजिव लिगवत:डागडुजीचे काम लवकरात लवकर करावे सुरू… ⚡वेंगुर्ला ता.१८-: डच वखार सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी एक महत्त्वाची वास्तू आहे. शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून डच वखार डागडुजी व दुरूस्तीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी सुमारे ३ ककोटी रूपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. त्यामुळे डच वखारीच्या डागडुजीचे काम लवकरात…

Read More

महोत्सवांमधून कलागुण जोपासा…

राजन तेली: सांस्कृतिक महोत्सवाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: कलागुण जोपासण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाची नितांत गरज आहे. युवक-युवतींनी या महोत्सवांमधून आपले कलागुण जोपासावे असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी सिंधु युवा विशालोत्सव.. शोध नाविन्याचा या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Read More

वेताळ प्रतिष्ठानचे काम युवकांना दिशा देणारे…

अर्चना घारे:वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग, छत्रपती मित्रमंडळ तुळस आणि सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.. वेंगुर्ला प्रतिनिधी- सध्यस्थितीत युवक समाजात दिशाहिन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरूण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायीक प्रशिक्षणे असे समाजहिताचे उपक्रम राबवित आहेत. आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम वेताळ प्रतिष्ठान करत असून त्यांचे हे कार्य…

Read More

आगामी काळात महिलांना आर्थिक बाबतीत उन्नत करण्यासाठी संस्था प्रयत्न करणार…

अपर्णा कोठावळे:नारी शक्तीचा केला सन्मान.. सावंतवाडी : ‘प्रयाण’ महिला पर्यटन संस्था महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असून आगामी काळात महिलांना आर्थिक बाबतीत उन्नत करण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कोठावळे यांनी केले. येथील नगरपरिषद सभागृहात प्रयाण महिला पर्यटन संस्थेमार्फत सावंतवाडी तालुक्यातील विशेष कार्य करणाऱ्या रणरागिणीचा…

Read More
You cannot copy content of this page