जोशी यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा पदभार..
ओरोस ता.११-:सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वादांकीत ठरलेल्या अधिष्ठाता डॉ सुनिता रामानंद यांच्याकडील पदभार अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने काढून घेतला आह हा पदभार महाविद्यालयाचे शरीररचना शास्त्र प्राध्यापक डॉ मनोज जोशी यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे अधिष्ठाता विरुद्ध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात गेले काही महिने सुरू असलेल्या वादाला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
