शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे…

संजू परब:पाच दुग्ध उत्पादकांचा परब यांच्या हस्ते सन्मान…

⚡बांदा ता.११-: शेतीला जोड धंदा म्हणून आज शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. तो करताना प्रामाणिक सचोटीने व आवडीने केल्यास चांगले यशस्वी होवू शकता यासाठी शेतकऱ्यांनी शेती पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य द्या असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चीदानंद उर्फ संजू परब यांनी इन्सुली येथे केले. इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संख्येच्या दशक महोत्सवी वर्धापन दिनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी श्री परब बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर मुंबई महानगर पालिकेचे निवृत अभियंता शिवाजी पालव, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, उपसरपच कृष्णा सावंत, दिलीप भालेकर, माजी सभापती अंकुश जाघव, पोलिस पाटील जागृती गावडे माजी सरपंच अर्जुन मेस्त्री, संस्था सचिव संजय सावंत, उपाध्यक्ष सहदेव सावंत, संचालक बाळा बागवे, महेंद्र पालव, रामचंद्र पालव, विलास गावडे, सौ. गितांजली हळदणकर, सुधिर गावडे आदि उपस्थित होते.
श्री परब म्हणाले की, इन्सुली दुग्ध संस्थेथे कार्य तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना व दुग्ध संस्थांना प्रेरणादायी आहे. दुग्ध उत्पादक शेतकरी संजय सावंत गेली दहा वर्षे दुध उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवत आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. याप्रसंगी पुढील वर्षी दुग्ध उत्पादनात प्रथम येणाऱ्या उत्पादकाला रोख पंचवीस हजारांचे पारितोषिक संजू परब यांनी जाहिर केले. प्रथम पाच दुग्ध उत्पादकांचा परब यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.
यात प्रथम कमाक संजय सावंत व्दितीय सौ. गितांजली हळदणकर, तृतिय राजेंद्र कुडव, चौथा रुपेश कुडव, पाचवा अशोक पडवळ यांचा यावेळी संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने संजू परब तसेच इन्सुली विकास संस्था नूतन चेअरमन आनंद राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकमाचे प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर यांनी केले.

You cannot copy content of this page