⚡वेंगुर्ला ता.११-: अयोध्या येथील राम मंदिर प्रतिष्ठापनेला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना सर्वत्र अयोध्या येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षता घरोघरी पोहचविण्यासाठी लगबग वाढली आहे. कुणीही निमंत्रणापासून वंचित राहू नये यासाठी रामभक्त काळजी घेत आहेत. दरम्यान, वेंगुर्ला-कॅम्प परिसरात असलेल्या कातकरी समाजालाही या निमंत्रक मंत्राक्षता देण्यात आल्या. यावेळी श्रीरामच आपल्या समाजाचे दैवत असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले. आपल्यालाही निमंत्रण मिळाल्याने त्यांना आनंद झाला. याप्रसंगी वृंदा मोर्डेकर, राहूल मोर्डेकर, सोहम भगत, दिगंबर वाडकर, विनिता सामंत, पूर्वा सामंत, भैय्या गुरव उपस्थित होते.
कातकरी समाजाला दिल्या निमंत्रक मंत्राक्षता…
