पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.११-: स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने नाट्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या जिल्ह्यातील पडद्यामागील कलाकारांचा सन्मान १२ जानेवारी रोजी होणार आहे.

  यामध्ये भानुदास मांजरेकर, विष्णू वायंगणकर, संजय राऊळ, विलास मयेकर (वेंगुर्ला), आनंद नानचे (परूळे), अमोल आरोसकर (सावंतवाडी), सुभाष कुमठेकर, सुधीर कद्रेकर (मालवण), बाळा आर्डेकर, संजू राणे (कणकवली), अशोक कुडाळकर, हेमंत वर्दम (कुडाळ) यांचा समावेश आहे. तसेच वेंगुर्ला येथे प्रथमच ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेचाही सन्मान करण्यात येणार आहे. वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात १२ जानेवारीपासून बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या एकांकिका स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी शुक्रवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

  या सन्मान कार्यक्रमाला तसेच १४ जानेवारी पर्यंत होणा-या एकांकिका स्पर्धांना नाट्यरसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन एकांकिका स्पर्धांचे आयोजक कलावलय या संस्थेने केले आहे.
You cannot copy content of this page