⚡मालवण ता.११-: मालवण देऊळवाडा येथील महापुरुष देवस्थान येथे तेली बांधवांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा विधिवत संपन्न झाला.
यावेळी पुरोहीतांच्या उपस्थितीत दिनेश डिचवलकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती व प्रसाद वाटप करून भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तेली समाजातील मान्यवर व समाज बांधव, महिला आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
