Headlines

Global Maharashtra Breaking News

घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…

सिंधुदुर्ग विभागात पंचक्रोशी समित्या स्थापन करण्यास प्रारंभ.. ⚡कणकवली ता.१९-:क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने पंचक्रोशी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे .क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाज संस्था १ मार्च , २०२४ रोजी स्थापनेच्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . अशावेळी समस्त घाडीगांवकर समाज बांधवांनी सुसज्ज घाडीगांवकर समाज भवन बांधण्याचा संकल्प केला आहे ….

Read More

कणकवली-टेंबवाडी येथे आजपासून कबड्डीचा महासंग्राम…

अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन.. ⚡कणकवली ता.१९-:कणकवली येथील अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने ‘एआरएम चषक २०२४’ या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली,टेंबवाडी येथील मैदानावर १९ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘कबड्डीचा महासंग्राम’ रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.या उदघाटन सोहळ्याच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.स्पर्धेतील पुरुष गट…

Read More

नळ पाणी योजनेचे काम त्वरित सुरू करा…

बबन साळगावकर: अन्यथा पालिकेवर धडक.. ⚡सावंतवाडी ता.१९-: राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सावंतवाडी नगर परिषदेला ५७ कोटी रुपयांची नळ पाणी योजना मंजूर होऊन सुमारे आठ महिने झाले. मात्र टेंडर होऊन तीन महिने होऊनही केवळ उदघाटनासाठी नळ पाणी योजनेचे काम रखडून ठेवण्यात आले आहे, हे सावंतवाडीच्या शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे,सदर नळ पाणी योजनेचे काम त्वरित…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

अर्चना घारे परब यांची माहिती: खडसे यांच्या येण्याने राष्ट्रवादी महिला संघटनेसाठी बळ मिळेल… सावंतवाडी : येथा २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते सावंतवाडी मँगो वन येते आयोजित राष्ट्रवादी मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत याबाबतची माहिती राष्ट्रवादी महिला कोकण विभागीय अध्यक्ष…

Read More

विशाल परब यांच्यामार्फत रेडीतील गरजूंना ३० हजारांची आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ले ता.१८-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. विशाल परब यांनी रेडी येथील वेदिका विनायक शेटकर याना घरदुरुस्तीसाठी १० हजार, मानसी सगुण सातोस्कर यांना घरदुरूस्थिसाठी १५ हजार, आर्या संजय राऊत हिला पदवीधर शिक्षणासाठी ५ हजार…

Read More

हळवल येथील समीरगुरव यांचे निधन…

⚡कणकवली ता.१८-:हळवल येथील रहिवासी समीर सुभाष गुरव ( वय 35 रा. हळवल -गुरववाडी ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून समीर परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, बहीणी, भावोजी, भाची, काका काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. समीर हे आमदार वैभव नाईक यांच्या जवळ चालक म्हणून काम करत होते. तर हळवल…

Read More

विशाल परब यांनी सिंधुदुर्गातील बेरोजगारी मुक्त करण्याचे उचललेले पाऊल कौतुकास्पद…

माजी नगरसेवकांकडून भरभरून कौतुक: असे तरुण नेतृत्व कोकणात उद्यास येण्याची गरज… ⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पक्षातील नेत्यांनी मंत्रीपदे भूषवली परंतु ते बेरोजगारांसाठी रोजगार नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केलेले दिसले नाही. जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी दिशा देण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडी रोजगार मेळावा घेऊन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील बेरोजगारी मुक्त करण्याचे उचललेले पाऊल…

Read More

इंटरनॅशनल चाइल्ड कॉम्पिटिशनच्या चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन स्कूल विद्यार्थ्यांचे यश

⚡सावंतवाडी ता.१८-: ऑगस्ट २०२३ घेण्यात आलेल्या ‘क्षितिज इंटरनॅशनल चाइल्ड आर्ट कॉम्पिटिशन अँड एक्झिबिशन’ या चित्रकला स्पर्धेत प्रशालेतील एकशे बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत जगभरातील विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यामध्ये पेंटिंग विभागात इयत्ता ४ थी मधील कु. भुवन पुंडलिक दळवी, इयत्ता ५ वी मधील कु. अस्मि धीरज सावंत व इयत्ता ३ री मधील जान्हवी दत्तात्रय…

Read More

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरालां उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.१८-: हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती 23 जानेवारी रोजी साजरी होत आहे. या निमित्त गुरुवारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्य गृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कार्यक्रमांची सुरवात मालवण येथे रक्तदान शिबिराने करण्यात आली. मालवण…

Read More

पोईप येथील वेताळ मुंजेश्वर मंदिरात २२ रोजी विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.१८-: अयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्या निमित्त पोईप येथील श्री देव वेताळ मुंजेश्वर मंदिर येथे पोईप ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९.३० वाजता श्री देव मुंजेश्वर मंदिरात अभिषेक, सकाळी १०. ३० वा. श्री देव वेताळ मंदिरात पूजा अर्चा व राम नामाचा जप,…

Read More
You cannot copy content of this page