कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा शहरातील बिजलीनगर व नाथ पै नगर येथे प्रचार युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व शिवसैनिकांनी सुरु केला आहे.
प्रचारदरम्यान सुशांत नाईक व शिवसैनिकांनी मतदारांशी संवाद साधला. प्रचारात युवासेनेचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, श्रीमती म्हसकर वनिता सामंत, बंड्या नाईक, समीर देसाई, किरण कदम, सागर सुतार, उत्तम सुद्रिक, रवी भंडारे, साई परब, लक्ष्मण हन्नीकोड यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. बिजलीनगर व नाथ पै नगरमधून राऊत यांना मताधिक्य देणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूती आहे. महागाई व बेरोजगारी यासह अन्य मुद्यांवरून जनतेने सत्ताधाऱ्यांवर रोष असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
