नारायण राणेंना सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मत देणार…

आनंद नेवगी: प्रभाग क्रमांक तीन मध्ये घरोघरी प्रचारावर भर..

⚡सावंतवाडी ता.२९-:
भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी व माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी केला आहे. सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.

श्री नेवगी म्हणाले की, सावंतवाडी शहरात भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून शहरातून मंत्री राणे यांना 90 टक्के मतदान देण्यात येणार आहे. यासाठी नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून शहरात घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सावंतवाडी शहरातून नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात येत असून याचा फायदा निश्चितच महायुतीचे उमेदवार राणे यांना मिळणार असल्याचा देखील नेवगी यावेळी बोलताना म्हणाले..

You cannot copy content of this page