⚡मालवण ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या आचरा विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव रामेश्वर मंदिरात भाजपचे प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आचरा ग्रा. पं. चे सरपंच जेरौन फर्नांडिस, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर, भाजप ज्येष्ठ नेते बाळू कुबल, राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालणकर, माजी पं. स. सभापती नीलिमा सावंत, मालवण खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, संतोष कोदे, राजन पांगे, सुनील जंगले, संतोष कामतेकर ,अभय भोसले , मांगरीश सांबारी, डॉ प्रमोद कोलंबकर, पप्पू कांबळी, सचिन हडकर , जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मतदारसंघातून नारायण राणे हे विक्रमी मताधिक्यांनी निवडून ये देऊ दे, असे गाऱ्हाणे श्री देव रामेश्वर चरणी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातले.
