शेर्पेत राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा शेर्पे गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काळेश्वर मंदिरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. शेर्पे गावातून राणे मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, शबान मुजावर, सरपंच स्मिता पांचाळ, उपसरपंच सिराज मुजावर, कुरंगवणेचे सरपंच संतोष ब्रह्मदांडे, उपसरपंच बबूल पवार, ग्रा. पं. सदस्य बबन शेलार, राजश्री बेळणेकर, शीलत कांबळे, मधुकर शेलार, सुरेश शेलार, अरुण ब्रह्मदांडे, सुभाष शेलार, दिनेश मुद्रस, सुरेश शेलार, महमंद जैतापकर, बाळू पांचाळ, रामा पांचाळ यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page