⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे याकरिता कणकवली पोलिसांनी खारेपाटण येथे संचलन केले. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने संचलन केले. संचलनात कणकवली पोलीस ठाणे अंमलदार ग्रुप, राज्य राखीव पोलीस दलाची गोंदिया, पुणे येथील शीघ्र दलाची तुकडी असे मिळून एकूण ९० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. खारेपाटण एसटी बसस्थानक , खारेपाटण एसटी बसस्थानक ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदरपर्यंत संचलन केले.
खारेपाटण येथे पोलीस पथकाचे संचलन..
