नारायण राणेंच्या प्रचारार्थ सावंतवाडीत २ मे ला महायुतीच्या रॅलीला निलेश राणे यांची उपस्थिती….

संजू परब यांची माहिती; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद..

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात
२ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे.या रॅलीचा शुभारंभ महायुतीच्या प्रचार कार्यालयातून मंत्री दीपक केसरकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

दरम्यान या रॅलीमध्ये एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील व त्यानंतर माजी खासदार निलेश राणे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत अशी माहिती श्री परब यांनी दिली.

You cannot copy content of this page