⚡बांदा ता.२४-: बांदा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासह सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजाराम उर्फ बाळु सावंत होते. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय चांदेकर, संचालक लक्ष्मण सावळ, भिकाजी धुरी, अप्पाजी देसाई, सुभाष परब, देऊ मळगावकर, लक्ष्मण जाधव, कामिनी कुडव, अर्चना आंबेलकर, संस्था गटसचिव मयुरी परब, कर्मचारी प्रकाश बांदेकर, विनया गवस, सुनीता कांबळे आदी उपस्थित होते. या सभेला संस्थेचे १०९ सभासद उपस्थित होते. सभेत संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आदर्श शेतकरी पुरस्कार शेर्ले येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग मळगावकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्थेचा प्रथम क्रमांक आल्याने या संस्थेचे चेअरमन गजानन गायतोंडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सचिव मयुरी परब यांची शासनमान्य गटसचिव म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईम्बर आणि उपकृषी अधिकारी मनाली परब यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

