कणकवली येथे २७ व २८ जानेवारी रोजी दुसरी सम्यक साहित्य कला संगीती…
संगीतीच्या अध्यक्षपदी उर्मिला पवार तर उद्घाटक म्हणून मोहनदास नैमिशराय यांची निवड.. ⚡कणकवली ता.१३-: कोकणातील अर्थात अपरान्त भूमीतील आंबेडकरी व पुरोगामी – परिवर्तनवादी साहित्यिकांचा, कलावंतांचा हक्काचा विचारमंच म्हणून ओळखल्या जाणार्या ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी’ या संस्थेच्या वतीने दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी ‘दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीती’चे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे करण्यात आले…
