नेरुर-कवठी रस्ता साईडपट्टी दुरुस्त करा…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची मागणी..

⚡कुडाळ ता.२१-:
कुडाळ ते नेरुर-चेंदवण-कवठी रस्ता साईडपट्टी खचून खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी मंगळवारी सार्वजनिक. बांधकाम विभागाच्या शेलटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी शिष्टमंडळासहीत केली.


नेरुर-कवठी रस्ता आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर होऊन पूर्ण झाला होता. परंतु, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्ता साईडपट्टी आणि डागडुजी देखभाल करण्याची जबाबदारी सा. बा. खात्याची आहे. आता पावसाळा आला असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सा. बा. गंभीर दखल घेऊन डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, नेरूर जि. प. शिवसेना उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर, चेंदवण शिवसेनेचे बाळासाहेब धुरी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page