हरकुळ बु. मधील नुकसानग्रस्त भागाची विनायक राऊतांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.२१-: गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा हरकुळ बुद्रुक गावातील शेख व खडकवाडीला बसला होता. या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली होती. खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.


यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, हरकुळ बु.चे सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, ग्रा. पं. सदस्य नित्यानंद चिंदरकर, माजी सरपंच दिवाकर पारकर, सोसायटी संचालक बाबुल पटेल, आसिफ मुजावर व ग्रामस्थ होते. नुकसाग्रस्तांना खा. राऊत यांनी तातडीची मदत म्हणून कौले व पत्रे उपलब्ध करुन दिले आहेत.

You cannot copy content of this page