राज्यातील निवडणुका संपल्याने आचारसंहिता शिथिल करा…

राजन तेली: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.२१-: कोकणात पावसाचे प्रमाण खूप असल्यामुळे तसेच विकासकामे पावसाच्या दिवसात करता येणारी नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघाचे मतदान पूर्ण झालेले असून महाराष्ट्र राज्यातील आचारसहित शिथिल करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे आज येथे केली.

दरम्यान काळात विकास कामे ही वर्क ऑर्डर शिवाय प्रलंबित राहीलेली आहेत,त्यामुळे तात्काळ आचारसहिता स्थितील करण्यात यावे अशी मागणी देखील श्री.तेली यांनी यावेळी निवेदनद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page