मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल निकाल ९९.२० टक्के…

⚡मालवण ता.२१-: कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के एवढा लागला आहे.

मालवण तालुक्यात ८७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५४ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

You cannot copy content of this page