उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर सुरू केले उपोषण; तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पाठिंबा..
⚡सावंतवाडी ता.२१-: तळवडे -नेमळे रस्त्याचा अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज तळवडे ग्रामस्थांचे अमर उपोषण येथील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरू केले.
यावेळी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान जोपर्यंत रस्ता सुरू करण्याचं कामाचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडून हटणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला.
