फोंडाघाट येथे उद्यापासून संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.२१-: फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्या फोंडाघाट शाखेतर्फे 22 व 23 मे या कालावधीत फोंडाघाट येथील नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले.
बुधवार 22 मे रोजी सकाळी 10 वा. स्त्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ. शमिता बिरमोळे यांचे व्याख्यान होईल. 11 वा. आरोग्य तपासणी शिबीर होणार असून यात फोंडाघाट प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव व त्यांचे सहकारी रुग्णांची तपासणी करणार आहेत. सायंकाळी 6 वा. स्त्रियांचे व मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होईल. गुरुवार सकाळी 9 वा. ध्वजारोहण, 10 वा. धम्मपूजापाठ, 10.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन या विषयावर कवयित्री प्रमिता तांबे यांचे व्याख्यान होईल. रात्री 9.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शन, बक्षीस वितरण सोहळा होईल. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page