Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुमित्रच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय सेवाभावामुळे तेरवणवासिय भारावून गेले. चंदगड आणि दोडामार्ग तालुक्याच्या सिमेवर अतिदुर्गमस्थानी असलेल्या तेरवण गावात हे पहिलेच आरोग्य शिबिर झाले. या शिबिराचा…

Read More

व्हॅन-बसमधील अपघातात 4 जण जखमी…

⚡कणकवली ता.०३-: अोरोसहून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला कोल्हापूरहून येणारी इंटरसिटी लक्झरी बसची धडक बसली. या अपघातात व्हॅन चालकासह 4 कर्मचारी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी 7 वा. सुमारास फोंड्याघाट येथील मुख्य धबधब्याजवळील तीव्र वळवणावर घडला. सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही. मात्र, व्हॅनचे मोठे नुकसान झाले. चालक तृप्ती मुळीक, हवालदार पाडळकर, कदम, निवतकर…

Read More

सिंधुदुर्गातील टॅक्सी चालकावर गोव्यात भुर्दंड नको…

राजन तेली: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे भेट घेत केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्गातील टॅक्सी चालक बांधवांना गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक भुर्दंड कमी व्हावा या मागणीसाठी आज माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान मोपा एअरपोर्ट मध्ये नवीन जागा भरती होणार आहे; त्यासाठी सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवकांना संधी देण्यात यावी…

Read More

नाटळ ग्रा. पं. च्या ग्रामसभेत राडा…

7 जण जखमी ः जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु ⚡कणकवली ता.०३-: नाटळ ग्रा. पं. च्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये राडा झाला. यात एक गटाचे 4 व्यक्ती तर दुसऱ्या गटाचे 3 व्यक्ती जखमी झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाटळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत…

Read More

अष्टपैलू स्नेहा नार्वेकरचा भाजपातर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०३-: दहावी परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात चौथा क्रमांक पटकाविलेल्या मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थीनी कु. स्नेहा राजन नार्वेकर हिचा भाजपातर्फे सत्कार करण्यात आला. तिला इयत्ता तिसरीपासूनच साहसी खेळांची आवड असून रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेतही तिची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. यापूर्वी समुद्रातील जलतरण स्पर्धेतही तिने सहभाग घेऊन राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारली होती. कु.स्नेहा…

Read More

माऊली मित्रमंडळातर्फे उत्तम सूर्यवंशी यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.०३-: केंद्रप्रमुख उत्तम आनंदा सूर्यवंशी हे सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा माऊली मित्रमंडळ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, अविनाश गावडे, सुभाष उबाळे यांच्यासह सूर्यवंशी यांच्या आई, पत्नी उपस्थित होत्या.राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते उत्तम सूर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम सूर्यवंशी…

Read More

मनसेच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन…

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची संकल्पना.. ⚡कुडाळ ता.०२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनसेच्या वतिने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.मानवाच्या प्रगती बरोबर शहराचा सुद्धा…

Read More

कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या…

उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे आवाहन.. सावंतवाडी दि.२ जून ( प्रतिनिधी)लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीनंतर समाजात तणाव, शांतता भंग होईल असे कुठे वातावरण असेल तर पोलिसांना माहिती दिली तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य आपल्या सहकार्याने करता येईल असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. दरम्यान अंमली पदार्थ, गोवा बनावट दारूची माहिती देण्याचे…

Read More

काँक्रीटीकरणाचे काम दर्जाहीन…

नारायण राणे यांची औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार.. बांदा ता.०२-: बांदा एसटी स्टँड येथे काँक्रीटीकरणचे काम सुरू असून त्या ठिकाणी जीएसबी च्या नावाखाली क्रशरचा डस्ट वापरण्यात आला आहे. सदर कामाचा पाया हा पूर्णपणे कमकुवत असून सदरचे काम बोगस करण्यात आलेले आहे अशी तक्रार शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे लेखी…

Read More

अनिल सरमळकर यांचा आपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०२-: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक नाटककार, परिवर्तन चळवळीतील तरूण विचारक, कोकणचे सुपुत्र अनिल सरमळकर यांनी आपच्या राज्यस्तरीय, कोकण प्रांत व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कणकवली येथे आपमध्ये प्रवेश केला. लवकरच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली. पक्ष प्रवेश कार्यक्रमा वेळी आपचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे,…

Read More
You cannot copy content of this page