श्रीकांत गावडे:दीपक केसरकर यांनी निर्णय न घेतल्यास आंदोलन..
आंबोली,ता.२१: सिंधुरत्न योजनेतून वन खात्याने आंबोलीत पॉईंटवर फिरण्यासाठी गाड्या लावल्याने येथील रिक्षा वाल्यांच्या पोटावर पाय आणला आहे. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन येथील वनखात्यामार्फत धंदे बंद करून स्थानिकांच्या पोटावर पाय आणल्यास रिक्षा व्यवसायिक तसेच ग्रामस्थांततर्फे आंदोलन करण्याचा ईशारा प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे यांनी दिला आहे.
आंबोलीत यावर्षी पर्यटन व्यवसाय तोट्यात गेला. अति पावसामुळे पर्यटक आले नाहीत.त्यात सिंधूरत्न् मधून दीपक केसरकर यांनी वन खात्यामार्फत पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी गाड्या लावून आंबोलीत रिक्षा व्यवसायिक तसेच स्थानिकांच्या पोटावर पाय आणला आहे. वन खात्याची जबाबदारी वन संरक्षण करण्याचे काम सोडून स्थानिक धंदे करण्यासाठी लावले आहे.जे काम शासनाचे खात्याचे आहे ते सोडून पर्यटनाचे धंदे सुरु झाले आहेत. वन संरक्षण करण्यासाठी भरती वन खात्यात झाली आहे की पर्यटन धंदे करण्यासाठी याचा शासनाने विचार करावा. स्थानिकांना रोजगार काही देता आलेला नाही. मात्र रोजगार हिरवण्याचा प्रकार स्थानिक आमदार केसरकरांकडून होत आहे.याबाबत तात्काळ निर्णय न केल्यास आंदोलन करण्यात येईल.निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा ईशारा प्रमुख सर गावकर श्रीकांत गावडे यांनी दिला आहे.
