ओझर विद्यामंदिर येथे उद्या पासून मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा…

मालवण (प्रतिनिधी)

क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच मालवण तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. २२, २३ व २४ ऑगस्ट या कालावधीत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगावच्या पटांगणावर करण्यात आले आहे.

यामध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा.पासून १४ वर्षे मुले मुली, दि. २३ रोजी सकाळी ९ वा. पासून १७ वर्षे मुले मुली व दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. पासून १९ वर्षे मुले मुली असे सामने होणार आहेत. तरी या स्पर्धेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page