Headlines

रॉयल ब्रदर्सच्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर विजेते…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील रॉयल ब्रदर्स यांच्या वतीने स्व. दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटीवर आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत सतीश आचरेकर यांनी प्रथम विजेतेपदाचा बहुमान मिळवला. तर विकी चोपडेकर उपविजेते ठरले. कोचरा येथील केदार झाड यांनी तृतीय तर अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.

स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३१,००० रुपये, १५००० रुपये, ५,००० रुपये आणि २,५०० व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्योजक सहदेव बापर्डेकर, रोहन आचरेकर, दर्पण सादये, कुलराज बांदेकर, सिल्व्हिस्टर फर्नांडीस, ओंकार यादव, एल्वीन फर्नांडीस, तुषार मसुरकर, हर्ष मिठबावकर, सचिन साळगावकर, कुणाल मालवणकर, वैभव खुरंदरे, प्रवीण वाघ, कल्पेश मसुरकर, भावेश पारकर, दीपेश साळगावकर, मोहन आचरेकर, वैभव मयेकर, विशाल निकम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गोपी मालवणकर व रुचिता शिर्के यांनी केले.

You cannot copy content of this page