सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु. अनम खानचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत जिल्हास्तरीयसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.२१-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मिलाग्रीस हायस्कूल , सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . अनम शब्बीर खान या विद्यार्थीनीची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

कु .अनम खान जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी आपल्या तालुक्याचे
प्रतिनिधित्व करणार आहे.या विद्यार्थिनीला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . अनम खान हिचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page