⚡वेंगुर्ल ता.२१-: वेंगुर्ले शिवसेनेतर्फे येथील रामेश्वर मंदिरात रविवार २५ ऑगस्ट रोजी सायं. ठिक ५ वाजता खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट वेंगुर्ले यांच्या सहकार्याने घेण्यात येणारी ही स्पर्धा दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांनी पुरस्कृत केली आहे.
१४ वर्षावरील वयोगटासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम तीन क्रमांकांना रोख ५०००, २५००, १५०० रुपये व चषक तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये तसेच सहभागी सर्वच स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला सूल-ताल-लयीचे ज्ञान आवश्यक आहे. सहभागी स्पर्धकाचे वय १४ वर्षापेक्षा कमी नसावे. स्पर्धकाने भगवान शंकरावर आधारित गीत सादर करणे अत्यावश्यक आहे.
सादरीकरणासाठी ७ मिनिटांचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. संगीतसाथ आयोजकांतर्फे पुरविण्यात येईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १६ स्पर्धकांना सहभाग देण्यात येईल. सहभागासाठी ७०६६८०२१५५ (सौ. मिताली) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.
