भगवा सप्ताह निमित्त ठाकरे सेनेचा उद्या मळेवाड जिल्हा परिषदे मध्ये संपर्क यात्रा…

⚡सावंतवाडी ता.२१-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २२ रोजी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे.

तरी दि. २२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…….
न्हावेली स. १०.३० वा.
गुळूदुवे स. ११.३० वा.
नाणेlस स. १२.३० वा.
भोमवाडी दु. १.३० वा.
धाकोरे संध्या. २.३० वा.
आजगाव संध्या. ३.३० वा.
मळेवाड संध्या. ४.३० वा.
आरोस संध्या. ५.३० वा.
पाडलोस संध्या. ६.३० वा.

सदर शिवसेना संपर्क यात्रेमध्ये जिल्हाप्रमुख श्री. बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख श्री रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक श्री चंद्रकांत गावडे,युवासेना जिल्हाप्रमुख श्री मंदार शिरसाठ महिला आघाडी विधानसभा संघटक सौ. सुकन्यां नरसुले, उपजिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत कासार, श्री. प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख श्री. यशवंत परब व श्री. संजय गवस माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजन मुळीक युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री सागर नाणेlसकर, युवा सेना तालुकाप्रमुख कौस्तुभ गावडे, महिला आघाडी तालुका संघटक भारती कासार, नम्रता झरापकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मायकल डिसोजा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page