बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी द्यावी…

ठाकरे सेनेच्या वतीने मागणी: सावंतवाडी पोलिसांना निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.२२-: बदलापूर येथील आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका पदाधिकारी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना दिले.

अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या लहान मुलीवर एक २४ वर्षीय नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केले. या नराधमाला भारतीय न्याय संहिते अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी या सर्व घटनेला संबंधित नराधमाबरोबर सर्व स्टाफ सुद्धा जबाबदार आहे. त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिले असते तर संबंधित घटना घडली नसती, या विरोधात संबंधित आरोपी तसेच सर्व व्यवस्थापन कर्मचारी स्टाफ हा सर्वस्वी जबाबदार आहे.या घटनेची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व खाजगी शाळा अंतर्गत लहान मुलींसाठी त्यांच्या देखरेखी साठी महिला स्टाफ नेमण्यात यावा, ही कार्यवाही येत्या सात दिवसात करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी यावी केली आहे.

यावेळी सावंतवाडी संघटक मायकल डिसोजा,उपसंघटक आबा सावंत,शब्बीर मणियार, तालुका संघटिका भारती कासार, शहर अध्यक्षा श्रुतिका दळवी, श्रावणी धुरी, विनोद ठाकूर,सुनील गावडे, सुशील चौगुले, समीरा शेख,विजया रजपुत, दिव्या पवार,प्रगती बामणे उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page