Headlines

Global Maharashtra Breaking News

ओझर विद्यामंदिरचे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सुयश…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या उंच उडी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरच्या अमृता गणेश बागवे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये ईशा गणेश…

Read Full News

डाॅ.कुडाळकर हायस्कुलच्या महिमा मोहिते हिचे मैदानी स्पर्धेत सुयश…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी येथील श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन मालवण संचलित डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल या प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. महीमा विशाल मोहिते हिने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ६०० मी व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. महिमा ही डेरवण रत्नागिरी येथे दि. १९…

Read Full News

आचरा परीसराला पाऊस आणि विजेचा तडाखा…!

⚡मालवण ता.१८-: आचरा परीसराला काल रात्री विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे भात नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले. तर त्रिंबक येथील विवेक नंदकुमार त्रिंबककर यांच्या दुकानावर वीज पडून इमारतीसह विद्यूत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. तसेच वीज वितरण विभागालाही फटका बसला आहे. काल गुरुवारी रात्री आचरा व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. पावसासोबत होणाऱ्या विजांच्या…

Read Full News

भाजप युवामोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्षपदी चिन्मय अशोक तळेकर यांची निवड…!

कणकवली / प्रतिनिधीकणकवली प्रहार भवन येथे कणकवली तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कणकवली तालुका उपाध्यक्षपदी चिन्मय अशोक तळेकर यांची निवड करण्यात आली. ही निवड युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, कणकवली तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, सर्वेश दळवी, सागर राणे आदी उपस्थित…

Read Full News

ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम…

नितेश राणे यांनी राजन तेलींच्या प्रवेशावर केल टिका: धुरी व राऊळ सारख्या निष्ठावंतांवर अन्याय.. ⚡कणकवली ता.१८-: उद्धव ठाकरे थेट राणेंवर बोलू शकत नाही त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र रचत आहेत मात्र त्यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले तरी आम्हाला फरक पडत नाही आमची महायुती सावंतवाडीत भक्कम आहे असा पलटवार आमदार नितेश…

Read Full News

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे पुन्हा स्वगृही…

राजन तेली यांच्यासोबत करणार ठाकरे शिवसेनेत प्रवेश; दीपक केसरकर यांना धक्का… ⚡सावंतवाडी ता.१८-: माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज ते उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत असतानाच दीपक केसरकर यांना आणखी एक धक्का बसला असून, काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले वेत्ये सरपंच गुणाजी गावडे हे देखील स्वगृही परतत…

Read Full News

राजन तेली यांचा विधानसभाप्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा…

आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश: सावंतवाडी भाजपला मोठा धक्का… ⚡सावंतवाडी ता.१८-: माजी आमदार राजन तेली यांनी भाजप विधानसभा प्रमुख व पक्ष सदस्यत्वाचा पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबाबत नुकताच त्यांनी राजीनामा वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्याकडे ऑनलाईनद्वारे राजीनामा दिला आहे. त्यामुळे…

Read Full News

राजन तेली यांचा अखेर भाजपला रामराम…

मातोश्रीवर उद्या संध्याकाळी प्रवेश: भाजपला मोठा धक्का ⚡सावंतवाडी ता.१७ -: माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपला रामराम केला असून उद्या संध्याकाळी ते स्वगृही परतणार आहेत.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याबाबतची माहिती सूत्रांकडून दिली आहे.

Read Full News

देवगड येथील विविध संघटनांच्या माध्यमातून रतन टाटा यांना श्रद्धांजली…!

देवगड (प्रतिनिधी) बागायती शेतकरी संघ देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारत देशाच्या औद्योगिक,विज्ञान-तंत्रज्ञान,कृषि,व्यापार, वाहतूक आदी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे वयाच्या ८७वर्षी दुःखद निधन झाले. देशाचा एक अनमोल हिरा अनंतात विलीन झाला.अशा या महान व्यक्तीला भावपूर्णश्रद्धांजली अर्पण करताना देवगड तालुक्यातील या…

Read Full News

जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या किंजल अदमचे यश…!

⚡देवगड ता.१७-: जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी: किंजल अदम हिने १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची दि.१९ ऑक्टोंबर रोजी डेरवण(चिपळूण) येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहेतिच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी कुमारी : किंजल अदम…

Read Full News

You cannot copy content of this page