नितेश राणे यांनी राजन तेलींच्या प्रवेशावर केल टिका: धुरी व राऊळ सारख्या निष्ठावंतांवर अन्याय..
⚡कणकवली ता.१८-: उद्धव ठाकरे थेट राणेंवर बोलू शकत नाही त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र रचत आहेत मात्र त्यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले तरी आम्हाला फरक पडत नाही आमची महायुती सावंतवाडीत भक्कम आहे असा पलटवार आमदार नितेश राणे यांनी राजन तेली यांच्या पक्षप्रवेशावर टीका करताना केली.
दरम्यान महायुती विरोधात लढायला ठाकरे सेनेत कोणीच नव्हते का बाबुराव धुरी ,रुपेश राऊळ यांच्यासारख्या निष्ठवंतावर ठाकरे सेनेने अन्याय केल्याचा देखील लगावला टोला. ते कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
