मालवण (प्रतिनिधी)
मालवण वायरी येथील श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन मालवण संचलित डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल या प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. महीमा विशाल मोहिते हिने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ६०० मी व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. महिमा ही डेरवण रत्नागिरी येथे दि. १९ व २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धा स्पर्धेमध्ये महिमा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
महिमा मोहिते हिला प्रशालेचे क्रीडा शिक्षक अजय शिंदे व क्रीडा प्रशिक्षक ताराचंद पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. महिमाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विलास झाड, उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, खजिनदार विनायक निवेकर मुख्याध्यापिका सौ नंदिनी साटलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
