आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश: सावंतवाडी भाजपला मोठा धक्का…
⚡सावंतवाडी ता.१८-: माजी आमदार राजन तेली यांनी भाजप विधानसभा प्रमुख व पक्ष सदस्यत्वाचा पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबाबत नुकताच त्यांनी राजीनामा वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्याकडे ऑनलाईनद्वारे राजीनामा दिला आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2014 पासून राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघात भाजप वाढवण्यास मोलाचा वाटा उचलला होता. मात्र दोन वेळा त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने राजन तेली नाराज होते. त्यांनी आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पक्षाकडे उमेदवारी मागितले असताना देखील पक्षाने अद्याप पर्यंत त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने राजन तेली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजत आहे. त्यामुळे आज ते ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
