Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा भाजप शहर अध्यक्षपदी नरसिंह कानेकर यांची नियुक्ती…

⚡बांदा ता.२०-: बांदा शहर अध्यक्षपदी नरसिंह कानेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिले. ही निवड बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी त्यांना उपस्थितांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मंदार कल्याणकर,शितल राऊळ, उदय नाईक, गुरु पेडणेकर, अशोक सावंत, मधुकर देसाई, रुपेश…

Read Full News

राजन तेली यांची युवासेनेची फळी मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी…

युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन केले मार्गदर्शन… सावंतवाडी ता.२०-:माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, आज त्यांनी युवासेनेतील पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली असून, यात त्यांनी निवडणुकीसंदर्भातील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करत मार्गदर्शन केले आहे. तसेच या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील रणनीती बाबत सूचना केल्या असून, युवासेना…

Read Full News

अवैध दारू वाहतूक प्रकरणी आंध्र प्रदेश येथील दोघे ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.२०-:आलिशान टाटा सफारी कार मधून गोवा ते आंध्र प्रदेश अशी होणारी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई करत रोखली. बारा लाखांची कार व दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेश मधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पन्नास दारूसह बारा कार जप्त करण्यात…

Read Full News

मुंबई विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत लीना धुरीने पटकावली तीन पदके…

मालवण (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठ मैदान मरीन लाईन येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या झोन दोन स्पर्धेत मालवण गवंडीवाडा येथील सुकन्या व मालवण वायरी येथील मातोश्री राखीताई पाटकर अकॅडमी ची खेळाडू लीना धुरी हिने झुनझुनवाला कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना महिलांच्या ४०० आणि २०० मीटर धावणे प्रकारात रजत पदक पटकावत यश मिळविले. तसेच १०० × ४ मिक्स रिले प्रकारात कांस्यपदक…

Read Full News

कोल्हापूर विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांची पेंडूर व मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट…

मालवण : (प्रतिनिधी) कोल्हापूर विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा व ग्रामीण रुग्णालय मालवण येथे भेट दिली. केंद्रीय कॉमन रेव्ह्यू मिशन पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्याची पूर्वतयारी व आढावा त्यांनी यावेळी घेतला. मालवण व पेंडुरं ग्रामीण रुग्णालयात सुमारे ५०० च्या वर डायलिसिस रुग्णांना सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले….

Read Full News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात पोलिसांचे संचलन…

देवगड (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता संचलन करण्यात आले. सीआय एसएफची तुकडी,स्थानिक व तालुक्याबाहेरील असे पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे.विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात संचलन…

Read Full News

आमदार नितेश राणे यांना तिकीट जाहीर होताचं कार्यकर्त्यांचा जल्लोष…

विजय नक्की… हॅट्रिक पक्कीच्या दिल्या घोषणा.. देवगड : प्रतिनिधी भाजपच्यावतीने कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविवारी सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी जामसंडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष केला. विधानसभेसाठी भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवगड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जामसंडे…

Read Full News

मल्लसम्राट प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा आयोजीत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी : येथील सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच योगदान देणाऱ्या मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवाच्या वतीने कोलगाव येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा तसेच मोफत औषध वितरण शिबिराला कोलगाव येथील नागरिकांचा व पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ३०९ रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधे देखील घेतली. प्रारंभी…

Read Full News

सुमती आचरेकर यांचे निधन…!

⚡कणकवली ता.२०-: फोंडाघाट:कै. सुमती महादेव आचरेकर वय 88 यांचे फोंडाघाट येथे 19 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.20 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर फोंडाघाट झरयेवाडी येथील  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मुळगाव कुर्ली – आंबेसखल हे असून त्या गेली अनेक वर्षे फोंडाघाट येथे राहत होत्या.फोंडाघाट बाजारपेठ येथील प्रसिद्ध सुवर्णकार सुरेश मालडीकर यांच्या त्या मामी होत.सामाजिक कार्यकर्ते मनोहर आचरेकर…

Read Full News

राजन तेली यांच्या प्रवेशानंतर सावंतवाडी मतदारसंघात ठाकरे सेनेची ताकद आणखीन मजबूत…

ठिकठिकाणी सावंतवाडी मतदारसंघात तेलींचे जंगी स्वागत: आगामी निवडणुकीसाठी राजन तेलींची जोरदार तयारी.. सावंतवाडी ता.२०-: माजी आमदार राजन तेली यांनी काल शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने सावंतवाडी मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली असून, ह्या विधानसभा निवडणूकीत ठाकरे गटाकडून राजन तेली निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळें सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनमध्ये…

Read Full News

You cannot copy content of this page