Headlines

अवैध दारू वाहतूक प्रकरणी आंध्र प्रदेश येथील दोघे ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.२०-:
आलिशान टाटा सफारी कार मधून गोवा ते आंध्र प्रदेश अशी होणारी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई करत रोखली. बारा लाखांची कार व दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेश मधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पन्नास दारूसह बारा कार जप्त करण्यात आली आहे.
राकेश पोलु पोईना वय 23 मुहम्मद अन्वर बेग वय 38 दोघे रा विजयवाडा आंध्रप्रदेश अशी संशयितांची नावे आहेत.
ही कारवाई रविवारी सायकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे करण्यात आली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांकडून सगळीकडे नाकाबंदी सुरू आहे या नाकाबंदी दरम्यान आंध्र प्रदेश येथे जाणार्या सफारी कारची पोलिसांकडून तपासण्यात करण्यात आली असता या गाडीत तब्बल दोन लाख तीन हजार रुपयाचा दारूचा अवैध मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दर क्षेत्राचे पो हवालदार दत्ता देसाई मनीष शिंदे राजेश नाईक यांच्या पथकाकडून करण्यात आली याप्रकरणी संबंधित दोघा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपीसे करीत आहेत.

You cannot copy content of this page