मालवण (प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठ मैदान मरीन लाईन येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या झोन दोन स्पर्धेत मालवण गवंडीवाडा येथील सुकन्या व मालवण वायरी येथील मातोश्री राखीताई पाटकर अकॅडमी ची खेळाडू लीना धुरी हिने झुनझुनवाला कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना महिलांच्या ४०० आणि २०० मीटर धावणे प्रकारात रजत पदक पटकावत यश मिळविले. तसेच १०० × ४ मिक्स रिले प्रकारात कांस्यपदक पटकावले.
लीना हिला मातोश्री राखीताई पाटकर अकॅडमीचे प्रशिक्षक ताराचंद पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. लीना हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
