युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन केले मार्गदर्शन…
सावंतवाडी ता.२०-:माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, आज त्यांनी युवासेनेतील पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली असून, यात त्यांनी निवडणुकीसंदर्भातील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करत मार्गदर्शन केले आहे. तसेच या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील रणनीती बाबत सूचना केल्या असून, युवासेना पदाधिकाऱ्यानी या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली युवासेनेच्या माध्यमातून युवकांची फळी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असून, याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
