विजय नक्की… हॅट्रिक पक्कीच्या दिल्या घोषणा..
देवगड : प्रतिनिधी
भाजपच्यावतीने कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविवारी सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी जामसंडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष केला.
विधानसभेसाठी भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देवगड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जामसंडे येथील भाजपा कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.यावेळी कार्यकर्त्यांनी विजय नक्की… हॅट्रिक पक्की अशा घोषणा दिल्या.यावेळी माजी आमदार अॅड.अजित गोगटे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहर अध्यक्ष योगेश पाटकर, भाजपा गटनेते शरद ठुकरूल, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, गणपत गावकर, राजा भुजबळ, नगरसेविका आद्या गुमास्ते, उल्हास मणचेकर, व्ही.सी.खडपकर, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी, राजेंद्र वालकर, रवींद्र कोयंडे, रविंद चिंदरकर, संजय तारकर, बापू जुवाटकर, चंदू कावले,कौस्तुभ जामसंडेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
