विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात पोलिसांचे संचलन…

देवगड (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरात सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता संचलन करण्यात आले. सीआय एसएफची तुकडी,स्थानिक व तालुक्याबाहेरील असे पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे.विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात संचलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड जामसंडे शहरात रविवारी २० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे संचलन करण्यात आले .
हे संचलन उपविभागीय पोलीस अधिकारी धनशाम आडाव यांच्या प्रमुख उपस्थितीत व देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड पोलीस ठाणे ते जामसंडे बाजारपेठ या मार्गावर हे संचलन करण्यात आले.या संचलनात पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, आनंद यशवंते, सीआयएसएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखविंदर सिंग, मनोजकुमार चव्हाण यांचे सह ४८ जवान, तसेच देवगड आचरा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page