राजन तेली यांच्या प्रवेशानंतर सावंतवाडी मतदारसंघात ठाकरे सेनेची ताकद आणखीन मजबूत…

ठिकठिकाणी सावंतवाडी मतदारसंघात तेलींचे जंगी स्वागत: आगामी निवडणुकीसाठी राजन तेलींची जोरदार तयारी..

सावंतवाडी ता.२०-:

माजी आमदार राजन तेली यांनी काल शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने सावंतवाडी मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली असून, ह्या विधानसभा निवडणूकीत ठाकरे गटाकडून राजन तेली निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळें सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी मतदार संघात राजन तेली यांचे आगमन होताच ठिक ठिकाणी त्यांचे शिवसेना ठाकरे गटाकडून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची सावंतवाडी तालुक्यातील ताकद अधिक मजबूत झाली आहे. तसेच पूर्वीचे शिवसैनिक जीजी उर्फ परशुराम उपरकर यांनी देखील मनसे मधून बाहेर पडल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आणखी ताकद मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात असल्याने महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

राजन तेली यांच्या पाठोपाठ आज परशुराम उपरकर असे दोन जुने शिवसैनिक पुन्हा एकदा स्वगृही परतल्याने जिल्ह्यात शिवसेनेला आणखी बळ मिळाले असून, जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाला नवी उभारी प्राप्त झाली आहे. सद्य परिस्थितीत राजन तेली विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत असून, सावंतवाडी मतदार संघात जोरदार कामाला लागले आहेत.

You cannot copy content of this page