⚡सावंतवाडी ता.१६-: माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित होत आहे.

यावेळी व्यासपीठावर नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, उपतालुका प्रमुख राकेश पवार, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, प्रणिल पोकळे, बबलू मिशाळ, दिलीप सांगावकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
