⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शहराचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मातेचे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, संजय माजगावकर, रुपेश नाटेकर, राजू कुबल आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच चराठा गावचे प्रमुख मानकरी, देवस्थानचे प्रमुख मानकरी आणि ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते.
