Headlines

Global Maharashtra Breaking News

वीणा मारुतीराव पुजारी यांनी स्वीकारला सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार…

⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग पत्तन विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा मारुतीराव पुजारी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांनी १ एप्रिल पासून कार्यभार स्वीकारला आहे. कणकवली पिडब्ल्युडीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर कणकवली पिडब्ल्युडीचे कार्यकारी अभियंता पद रिक्त होते. या रिक्त असलेल्या कार्यकारी…

Read Full News

वृद्धावर जीवघेणा हल्ला करत सोन्याची चैन अज्ञाताने चोरली…

⚡वैभववाडी ता.०१-: लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत पोबारा केला. पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर रा. नापणे धनगरवाडा असे या हल्ला झालेल्या वृद्धाचे नाव असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नापणे धनगरवाडा येथे घडली.नापणे…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्षपदी स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिला आहे. डॉ गिरीश कुमार चौगुले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती तर यापूर्वी वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना पुन्हा अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे तर डॉ….

Read Full News

वैभववाडीत जोरदार वादळी पाऊस…

⚡वैभववाडी ता.०१-: वैभववाडी तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका काजू व आंबा बागायतदारांना बसला आहे. दिवसभर ढगाळ व दमट हवामानामुळे दिवसभर गर्मी खूप होत होती. सायंकाळी 6.30 दरम्याने अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी या पावसाचा आणि…

Read Full News

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…

महेश सारंग: स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: नारायण राणे यांच्यात ७४ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने खुली पुरुषांची जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे.याबाबतची माहिती जिल्हा भाजप चिटणीस महेश सारंग यांनी आज येथे दिली. ही स्पर्धा दिनांक ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.तरी जिल्हातील स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण कोटा निश्चित…

मालवण दि प्रतिनिधीग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षणाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मालवण तालुक्यासाठी 65 ग्रामपंचायत सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पद्धतीने निश्चित करण्यासाठी प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण सोडत मंगळवार 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार…

Read Full News

आचरा येथे हनुमान जयंती निमित्त नृत्य स्पर्धा…

मालवण दि प्रतिनिधीइनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित राम उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त शुक्रवारी रामेश्वर मंदिर येथे ११ एप्रिल रोजी राम गीतावर आधारित भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.प्रथम येणाऱ्या १५ स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.यासाठी प्रथम पारितोषिकरोख रुपये ७०००/- व चषक,द्वितीय पारितोषिक :रोख रुपये ५०००/- व चषक,तृतीय…

Read Full News

समर्थ गड – आडवली येथे स्वामी जयंती सोहळा उत्साहात…

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा भाविकांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्त ०३ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी प्रकटदिनी सकाळी विधिवत पूजा, सकाळी भक्तांना दर्शन,दुपारी महाआरती, दुपारी महाप्रसाद, दुपार नंतर हळदी कुंकू, रात्री महाआरती, व…

Read Full News

सशक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी छञपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचले पाहीजेत…!

निलेश सावंत ; बांदा शहरात स्मरण मुकपद यात्रा… ⚡बांदा ता.०१-: छत्रपती संभाजी महाराज यांना झालेल्या यातनांचे स्मरण करत सशक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजेत. महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मरक्षक व स्वराज्यरक्षक होते. स्वराज्यनिष्ठेसाठी त्यांचे बलिदान हे न विसरता येण्यासारखे आहे. आताच्या पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची निष्ठा जपावी…

Read Full News

बांदा १ नंबर केंद्रशाळेतील तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड…

⚡बांदा ता.०१-: पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर, स्वरा दिपक बांदेकर व शुभम भगवान झोरे या तीन विद्यार्थ्यांची निवड जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे झाली असून शाळेचे विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवड होण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम राहिली आहे. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन…

Read Full News

You cannot copy content of this page