⚡वैभववाडी ता.०१-: वैभववाडी तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका काजू व आंबा बागायतदारांना बसला आहे. दिवसभर ढगाळ व दमट हवामानामुळे दिवसभर गर्मी खूप होत होती. सायंकाळी 6.30 दरम्याने अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी या पावसाचा आणि हा वादळाचा जास्त परिणाम काजू आंबा बागायतदारांना बसला आहे.
वैभववाडीत जोरदार वादळी पाऊस…
