बांदा १ नंबर केंद्रशाळेतील तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड…

⚡बांदा ता.०१-: पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर, स्वरा दिपक बांदेकर व शुभम भगवान झोरे या तीन विद्यार्थ्यांची निवड जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे झाली असून शाळेचे विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवड होण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम राहिली आहे.

चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या परीक्षेसाठी सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदयाला दरवर्षी निवड होत असते. याही वर्षी विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयाला निवड झाल्याबद्दल शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, बांदा सरपंच प्रियंका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मुख्याध्यापक शांताराम असनकर ,पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षक जे.डीपाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, रसिका मालवणकर, स्नेहा घाडी,जागृती धुरी,मनिषा मोरे यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो:-
बांदा येथे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मान्यवर.

You cannot copy content of this page