मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळा भाविकांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्त ०३ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी प्रकटदिनी सकाळी विधिवत पूजा, सकाळी भक्तांना दर्शन,
दुपारी महाआरती, दुपारी महाप्रसाद, दुपार नंतर हळदी कुंकू, रात्री महाआरती, व त्या नंतर
पारंपरिक डबलबारी भजन सामना
बुवा श्रीधर मुणगेकर विरुद्ध बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात झाला.
०१ एप्रिल रोजी रात्री वाजता मराठी वाद्यवृंद (चिमणी पाखरं) महाराष्ट्राची पारंपारिक लोकधारा हा कार्यक्रम झाला . 2 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता हिंदी वाद्यवृंद (चिमणी पाखरं)नृत्य-अविष्कार, भन्नाट कॉमेडी, मिमिक्री.
3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सांगता सोहळा विधिवत पूजा, रात्री 8 ते 8.30 महाआरती, रात्री 9 वाजता 20-20 डबलबारी भजन सामना बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अजित मुळम या दोहोच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली यांच्या वतीने भाई महाराज यांनी केले आहे.
