मालवण दि प्रतिनिधी
ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षणाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मालवण तालुक्यासाठी 65 ग्रामपंचायत सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पद्धतीने निश्चित करण्यासाठी प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण सोडत मंगळवार 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.
तरी सदर आरक्षण सोडत कार्यक्रमाला मालवण तालुक्यातील सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी प्रवर्गनिहाय सरपंच पद आरक्षण निश्चितीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
