Headlines

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा मराठी, मालवणी बोलणारा सर्वसामान्य उमेदवार…

जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती.. सावंतवाडी ता.०४-:सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हामराठी, मालवणी बोलणारा, सर्वसामान्य घरातील आणि जनतेसाठी चोवीस तास वेळ देणारा असणार आहे, अशी माहिती शिंदे सेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली

Read Full News

डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ…

कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथील रस्त्याच्या बाजूला बेंगलोर (कर्नाटक) येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी (वय ५६) यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चार संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेला काही दिवस उलटून गेले असले तरी, खून प्रकरणामागचे नेमके कारण अद्याप उघडकीस आलेले नाही. कणकवली पोलिस आणि स्थानिक गुन्हे…

Read Full News

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर…

⚡ओरोस ता.०४-: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेने सन 1978 पासून प्रवासाला सुरुवात केली, सर्वोत्तमतेचा ध्यास घेत वेगळेपणाची कास धरत गेली 47 वर्ष न थांबता अविरतपणे ही चळवळ…

Read Full News

कणकवलीत ११ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर…

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन.. कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर ते रविवार १६ नोव्हेम्बर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत हॉटेल उत्कर्ष, एसटी स्टँड समोर, कणकवली येथे हे शिबीर होणार आहे. जास्तीत जास्त…

Read Full News

युवा सेनेची जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्राची मागणी…

मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा पहिला AI जिल्हा ठरला. मात्र येथील युवा वर्गाला परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्र जिल्ह्यात नसल्याने परजिल्ह्यात जावे लागते त्याला लागणार खर्चाचा भुर्दंड येथील युवकांना पडतोय. सर्व शासकीय परीक्षा,स्पर्धा परीक्षा केंद्र जिल्ह्यात व्हावे यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत अशी मागणी युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Read Full News

कळसुली-गडगेवाडी येथे धाडसी घरफोडी…

२० तोळे सोने, चांदीचे दागिने आणि ३ लाखांची रोकड लंपास.. कणकवली : कळसुली-गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी तब्बल २० तोळे सोने, काही चांदीचे दागिने आणि सुमारे तीन लाख रुपये रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या…

Read Full News

आम्हाला महायुतीची गरज नाही,आमचे २० उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा चेहराही तयार…

संजू परब:दीपक केसरकर या शहराचे ‘विकासाचे रत्न.. ⚡सावंतवाडी, ता. ०४-:“आमचे २० उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा चेहराही तयार आहे. आम्हाला महायुतीची गरज नाही,” असा ठाम दावा शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला. परब म्हणाले, “शहरात आमदार दीपक केसरकर यांनी साडेसोळा कोटी रुपयांचा निधी आणून अनेक विकासकामांना गती दिली आहे….

Read Full News

संस्कार नॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी कु.सौम्या परब हिची हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये विभाग स्तरावर निवड…

⚡सावंतवाडी ता.०४-: १५ ऑक्टोबर २०२५ हा दिवस संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेतील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सौम्या संजय परब हिच्यासाठी एक अभिमानास्पद दिवस ठरला आहे. जिल्हा स्तरावरील हर्डल्स या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसरी येण्याचा मान मिळवून आपल्या जबरदस्त कामगिरीची नोंद तिने केली.तिच्या या सातत्यपूर्ण आणि वेगवान कामगिरीमुळे तिची निवड थेट…

Read Full News

गणेश मूर्तिकारांचा ९ रोजी मेळावा…!

⚡मालवण ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघातर्फे गणेश मूर्तिकारांचा मेळावा रविवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जानकी मंगल कार्यालय, कुंभारमाठ, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात श्री गणेश मूर्तीकार संघाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला जाईल. राज्य पातळीवर मूर्तिकारांच्या कामाचाही आढावा सादर केला जाईल. संघाच्या पुढील वाटचालीबाबत…

Read Full News

कुडाळ – मालवण रस्त्याबाबत ठाकरे सेनेचे जनआंदोलन…

माजी आमदार वैभव नाईक यांनी केले नेतृत्व:सा.बा.च्या अधिकाऱ्यांची झाडाझडती.. ⚡कुडाळ ता.०४-: कुडाळ मालवण राज्य मार्ग सध्या खड्ड्यानी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे कुडाळ नेरूरपार मालवण रस्त्याच्या या दुरवस्थेबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या वतीने आज होबळीचा माळ येथे जनआंदोलन करण्यात आलं. माजी आमदार वैभव नाईक यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page